शाब्दिक उदाहरणे बेरीज,वजाबाकी

बेरीज उदाहरण 2

views

2:59
बेरीज उदाहरण 2: एका रेफ्रिजरेटरची किंमत १३७५० व एका कपाटाची किंमत ८९९९ आहे तर दोन्ही वस्तू खरेदी केल्यास दुकानदाराला एकूण किती रुपये द्यावे लागतील? मुलांनो, पहा: या उदाहरणात रेफ्रिजरेटर व कपाटाची किंमत दिली आहे व दोघांना एकूण किती खर्च झाला हे काढायचे आहे. उदाहरणात आपल्याला एकूण खर्च विचारल्यामुळे येथे आपल्याला बेरीज ही क्रिया करावी लागणार आहे. चला, आता आपण उदाहरण सोडवून बघूया. प्रथम आपण हे गणित उभ्या मांडणीत लिहू. म्हणजे १३७५० + ८९९९ यांची मांडणी एकाखाली एक करू. नंतर बेरजेस सुरवात करू. सुरवात एककापासून करावी लागेल. शून्य एककात ९ एकक मिळवायचे आहेत. कोणत्याही संख्येत शून्य मिळवल्यास बेरीज तीच संख्या येते. म्हणून ०+९ = ९ झाले. म्हणून एककाच्या घरात उत्तरात १ लिहू. आता दशकातील ५ दशक व ९ दशक यांची बेरीज करू. ही बेरीज केली असता १४ दशक झाले. या १४ दशकामध्ये १ शतक व ४ दशक आहेत. म्हणून १ हातचा आपण शतकाच्या घरात ७ च्या डोक्यावर लिहू. आणि ४ हे दशकात खाली उत्तरात लिहू.आता शतकाच्या घरात ७ + ९ शतक आहेत. आणि त्यात १ हातच्याचा शतक मिळवला तर एकूण १७ शतक झाले. या १७ मधील १ हजाराच्या घरात ३ च्या डोक्यावर लिहू. आणि ७ खाली उत्तरात शतकाच्या घरात लिहू. हजाराच्या घरातील ३+८+१ हजार मिळवले असता एकूण १२ हजार झाले. या १२ मधील १ दशहजाराच्या घरात लिहिला. आणि २ हजाराच्या घरात खाली उत्तरात लिहिले. शेवटी १+१ दशहजार मिळून २ दशहजार झाले. म्हणजे १३७५० + ८९९९ = २२७४९ झाले. अशाप्रकारे दोन्ही वस्तू खरेदी केली असता २२,७४९ रुपये द्यावे लागतील.