शाब्दिक उदाहरणे बेरीज,वजाबाकी

वजाबाकी

views

3:20
वजाबाकी : आता आपण वजाबाकीची काही शाब्दिक उदाहरणे समजून घेऊया. उदा.१) एका शाळेतील ग्रंथालयात १४७३ पुस्तके मराठी भाषेतील आहेत व ५८६ पुस्तके हिंदी भाषेतील आहेत, तर कोणत्या भाषेतील पुस्तके किती जास्त आहेत? पहा, मुलांनो: या उदाहरणात पुस्तकाची संख्या दिली आहे. आणि कोणत्या भाषेतील पुस्तकांची संख्या जास्त आहे हे काढायचे आहे. च्यापेक्षा जास्त किंवा कमी जेव्हा उदाहरणात विचारले जाते तेव्हा वजाबाकी करतात हे आपल्याला माहीत आहे. यात दिलेली माहिती आहे: १४७३ मराठी भाषेची व ५८६ हिंदी भाषेची पुस्तके. आणि आपल्याला काढायचे आहे: कोणत्या भाषेतील पुस्तके जास्त आहेत. म्हणून आपल्याला वजाबाकी ही क्रिया करावी लागणार आहे. रीत – मुलानो प्रथम आपण हे उदाहरण उभ्या मांडणीत सोडवू. याही उदाहरणात सुरवात एककापासून करू. पहा, ३ एकका मधून ६ एकक वजा होत नाहीत. म्हणून दशकातून १ दशक एककात घेतला. त्यामुळे दशकात ७ मधून १ दशक कमी झाला असता ६ दशक शिल्लक राहिले. आणि एककात एक दशक सुट्टा केला असता १० एकक झाले. म्हणून आता एककाच्या घरात १० एकक + पूर्वीचे ३ एकक मिळून १३ एकक झाले. १३ एककातून ६ एकक वजा केले असता ७ उरतात. दशकाच्या घरातील ६ दशकातून ८ दशक वजा होणार नाहीत. म्हणून शतकाच्या घरातून १ शतक दशकाच्या घरात घेतला. त्यामुळे शतकात ३ शतक शिल्लक राहिले. आणि दशकात १० + ६ दशक मिळून एकूण १६ दशक झाले. या १६ मधून ८ वजा केले असता ८ दशक शिल्लक राहिले. शतकाच्या घरातील ३ शतकामधून ५ शतक वजा होणार नाहीत. म्हणून हजाराच्या घरातून १ हजार घेतला. हजाराच्या घरात एकच हजार होते. आणि तेही शतकात दिल्यामुळे आता हजारात शून्य हजार राहिले. आणि शतकात एकूण १३ शतक झाले. या १३ मधून ५ शतक वजा केले असता ८ शतक शिल्ल राहिले. हजाराच्या घरात शून्य शतक असल्याने हा शून्य तसाच खाली उत्तरात लिहिला. म्हणजे १४७३ -५८६ = ८८७ म्हणून हिंदी भाषेच्या पुस्तकांपेक्षा मराठी भाषेची पूस्तके ८८७ ने जास्त आहेत.