राज्यकारभाराची घडी बसवली Go Back प्रस्तावना views 5:13 प्रस्तावना: मुलांनो, आपण पाहिले की शिवरायांनी किती कष्टाने, प्रयत्नाने स्वराज्य उभे केले. म्हणतात ना, कोणतीही गोष्ट मिळविणे, कमविणे सोपे असते, पण ते टिकवून ठेवणे खूप अवघड असते. ते अवघड काम सोपे करण्यासाठी महाराजांनी राज्याभिषेकानंतर स्वराज्याची घडी व्यवस्थित बसविण्याचे कार्य हाती घेतले. त्याची माहिती आपण या पाठात पाहणार आहोत. राज्यकारभाराची घडी: शिवरायांनी जिवाचे रान करून म्हणजेच अतिशय कष्टाने स्वराज्याची स्थापना केली. त्यासाठी त्यांनी अनेकवेळा आपला जीवही धोक्यात घातला. स्वत:चा राज्याभिषेक करून घेतला व आपल्या राज्याला त्यांनी सर्वांकडून मान्यता मिळवली. हिंदवी स्वराज्याचे ते छत्रपती झाले. महाराजांच्या स्वराज्यातील प्रजा सुखी होती. महाराष्ट्रातील देव-देवळे सुरक्षित होती. मुलांनो, आजच्या काळात आपल्या राज्याचा कारभार व्यवस्थित चालावा म्हणून मुख्यमंत्री व विविध खात्यांचे मंत्री असतात, त्याचप्रमाणे महाराजांनी निरनिराळी आठ खाती निर्माण केली. प्रत्येक खात्यावर एकेक प्रधान प्रमुख म्हणून नेमला. प्रत्येक खाते त्या त्या प्रधानाकडे सोपवले. हेच शिवरायांचे ‘अष्टप्रधान मंडळ’ होय. प्रस्तावना शिवरायांची संरक्षण – व्यवस्था मराठ्यांचे आरमार हेर खाते