मानवी वस्ती Go Back मानवी वस्तींचे आकृतिबंध views 3:30 मानवी वस्तींचे आकृतिबंध : मुलांनो, आपण या आकृत्यांचे नीट निरीक्षण केले तर चित्र ‘अ’ आणि ‘ब’ मधील मानवी वस्ती तसेच चित्र ‘ब’ आणि ‘क’ मधील मानवी वस्ती यांत कोणता फरक जाणवतो. तर पाहा चित्र ‘अ’ मधील वस्ती ही नदीच्या किनारी आहे. तर चित्र ‘ब’ मधील वस्ती ही रस्त्याच्या कडेला एका सरळरेषेत आहे. पण चित्र ‘क’ मधील वस्तीत एकच घर दिसते आहे. म्हणजेच दोन पेक्षा कमी घरे असणारी वस्ती ही चित्र ‘क’ मध्येच आढळते आहे. आता मुलांनो, मला सांगा, तुम्ही राहत असलेली वस्ती यांपैकी कोणत्या प्रकारात येते ? नकाशाशी मैत्री : मुलांनो, हा नकाशा पाहा आणि त्याचे नीट निरीक्षण करा. मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे त्यांची मला उत्तरे द्या. आकृती वस्ती प्रकार आणि स्थलदर्शक नकाशाचा भाग या दोन्ही आकृतींच्या अभ्यासावरून आपल्या असे लक्षात येते की, मानव वेगवेगळ्या नैसर्गिक परीस्थितींमध्ये बदल करून निसर्गाशी स्वत:ला जुळवून देखील घेतो. निसर्गामध्ये असलेल्या सोयीनुसार मानवी वस्तींचे आकृतिबंध निर्माण होतात. प्रस्तावना भौगोलिक स्पष्टीकरण मानवी वस्तींचे आकृतिबंध भौगोलिक स्पष्टीकरण: निवाऱ्याच्या साधनांतील प्रगती विखुरलेली वस्ती रेषाकृती वस्ती