मूलभूत हक्क भाग १

प्रस्तावना

views

2:49
प्रस्तावना :- मुलांनो, आतापर्यंत आपण संविधान म्हणजे काय, संविधानाची उद्देशिका, संविधानाची वैशिष्टये काय आहेत ते पाहिले. आता या पाठामध्ये आपल्याला संविधानाने कोणते मूलभूत हक्क दिले आहेत ते पाहणार आहोत. मानवाला मानवासारखे जगता यावे, त्याच्या गुणांचा आणि कौशल्यांचा विकास व्हावा, त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये म्हणून संविधानाने नागरिकांना काही हक्क दिले आहेत. मुलभूत हक्क: मुलांनो, व्यक्तीला जन्मत:च काही हक्क प्राप्त होतात. जन्मलेल्या प्रत्येक बालकाला जगण्याचा हक्क असतो. बाळाला चांगले आरोग्य मिळावे म्हणून संपूर्ण समाज म्हणजे डॉक्टर, बाळाचे आईवडील, त्याचे नातेवाईक सर्वच जण प्रयत्न करतात. व्यक्तीला उत्तम आरोग्य मिळावे, त्याच्या अंगभूत कौशल्यांचा विकास व्हावा, प्रत्येक व्यक्तीवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये, यासाठी पोषक परिस्थिती निर्माण करण्यासाठी संविधानाने भारतातील सर्व नागरिकांना समान हक्क दिले आहेत. त्यांना ‘मूलभूत हक्क’ असे म्हणतात.