मूलभूत हक्क भाग २

प्रस्तावना

views

2:55
प्रस्तावना मुलांनो, याआधीच्या पाठात आपण संविधान म्हणजे काय त्याची उद्देशिका काय आहे, त्यामध्ये कोणत्या संज्ञा वापरल्या आहेत, त्यांचा अर्थ काय, संविधानाने दिलेले हक्क कोणते, या सर्व गोष्टींचा अभ्यास केला. स्वातंत्र्याचा हक्क, समानतेचा हक्क व शोषणाविरुद्धचा हक्क हे आपले मूलभूत हक्क आहेत. या हक्कांचा नेमका अर्थ काय आहे, तसेच मूलभूत हक्कांना असलेल्या न्यायालयीन संरक्षणाविषयी माहिती आपण जाणून घेऊयात. धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क: मुलांनो, भारतात हिंदू, मुस्लिम, बौद्ध, शीख, पारसी असे विविध धर्मांचे लोक राहतात हे तुम्हाला माहित आहे. भारत हा एक धर्मनिरपेक्ष देश आहे. आपली राष्ट्रभाषा हिंदी आहे, राष्ट्रध्वज तिरंगा आहे, तसा अधिकृत धर्म इथे नसून सर्व धर्म समान मानले आहेत. त्यासाठी आपल्या संविधानात काही तरतुदी केल्या आहेत. त्याचे काही नियम केले आहेत. त्यालाच ‘धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क’ असे म्हणतात.