शिवरायांचे शिक्षण

पुण्याचा कायापालट

views

2:35
जिजाऊ आणि शिवराय पुण्याला आले. शिवरायांची वयाची पहिली सहा वर्षे याच ठिकाणी गेली होती. त्यांना त्यांच्या बालपणीचे दिवस आठवले. बालपणी ते आपल्या सवंगडयांबरोबर याच शिवनेरीच्या मातीत खेळले होते. सह्याद्री पर्वताची उंच उंच शिखरे त्यांना पुन्हा दिसू लागली, त्यांना आपल्या जन्मभूमीत परत आल्याचा खूप-खूप आनंद झाला. त्या वेळचे महाराजांच्या काळातील पुणे हे आजच्या पुण्याइतके मोठे नव्हते. परंतु शहाजीराजांच्या शत्रूंनी अनेकवेळा पुण्यावर स्वाऱ्या करून ते सुंदर गाव, उजाड करून टाकले होते. पुणे पूर्वीसारखे गजबलेले राहिले नव्हते. गावातील मालमत्तेची मोडतोड झाली होती. घरे कोसळली होती. देवळे पडली होती. पुण्याचे प्रचंड नुकसान झाले होते. शत्रूच्या भीतीने लोक गाव सोडून पळून गेले होते. लोकच नव्हते. तर शेती कोण करणार? त्यामुळे शेते न पिकता तशीच पडून होती. लोकांचा वावर कमी, त्यामुळे जंगले हवे तशी वाढली होती. रानात लांडगे माजले होते. त्यांचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे लोकांच्यात नेहमी भीतीचे वातावरण असे. अशी पुण्याची अत्यंत वाईट अवस्था झाली होती. जिजाऊ आणि शिवराय पुण्याला आले. शिवरायांची वयाची पहिली सहा वर्षे याच ठिकाणी गेली होती. त्यांना त्यांच्या बालपणीचे दिवस आठवले. बालपणी ते आपल्या सवंगडयांबरोबर याच शिवनेरीच्या मातीत खेळले होते. सह्याद्री पर्वताची उंच उंच शिखरे त्यांना पुन्हा दिसू लागली, त्यांना आपल्या जन्मभूमीत परत आल्याचा खूप-खूप आनंद झाला. त्या वेळचे महाराजांच्या काळातील पुणे हे आजच्या पुण्याइतके मोठे नव्हते. परंतु शहाजीराजांच्या शत्रूंनी अनेकवेळा पुण्यावर स्वाऱ्या करून ते सुंदर गाव, उजाड करून टाकले होते. पुणे पूर्वीसारखे गजबलेले राहिले नव्हते. गावातील मालमत्तेची मोडतोड झाली होती. घरे कोसळली होती. देवळे पडली होती. पुण्याचे प्रचंड नुकसान झाले होते. शत्रूच्या भीतीने लोक गाव सोडून पळून गेले होते. लोकच नव्हते. तर शेती कोण करणार? त्यामुळे शेते न पिकता तशीच पडून होती. लोकांचा वावर कमी, त्यामुळे जंगले हवे तशी वाढली होती. रानात लांडगे माजले होते. त्यांचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे लोकांच्यात नेहमी भीतीचे वातावरण असे. अशी पुण्याची अत्यंत वाईट अवस्था झाली होती. पुणे सोडून आसपासच्या प्रदेशात राहायला गेलेल्या लोकांना समजले, की जिजाऊ व शिवराय पुण्यात राहू लागले आहेत. तेव्हा त्यांना मोठा धीर आला. जिजाबाईंनीही लोकांना जवळ बोलावून दिलासा दिला. त्यामुळे लोक पुन्हा पुण्याला येऊन राहू लागले. शेती करू लागले. जिजाबाईंनी पडकी मंदिरे दुरुस्त करून घेतली. मंदिरात सकाळ-संध्याकाळ पूजा होऊ लागली. गावात लोक राहू लागल्याने गाव लोकांनी गजबजू लागले. त्यामुळे उजाड पडलेल्या पुण्याचे रूप पालटले अशा प्रकारे जिजाऊनी स्वत: पुण्याची परिस्थिती बदलून टाकली.