सागरी प्रवाह

सांगा पाहू!

views

3:18
आता आपण सागरी प्रवाहांमुळे काय होते, हे एका उदाहरणाच्या साहाय्याने पाहाणार आहोत. १० जानेवारी १९९२ मध्ये पॅसिफिक महासागरात एक अजब घटना घडली. एक माल वाहून नेणारे जहाज हाँगकाँगकडून अमेरिकेकडे निघाले असता पॅसिफिक महासागरातून प्रवास करताना हवाई बेटाजवळ या जहाजातील खेळणी भरलेला एक कंटेनर महासागरात कोसळला व फुटला. या कंटेनरमधील सुमारे २८००० रबरी खेळणी महासागराच्या पाण्यावर तरंगू लागली. यानंतर काही म्हणजेच १० महिन्यांनी आणखी एक आश्चर्यकारक प्रकार पाहायला मिळाला. १६ नोव्हेंबर १९९२ रोजी यातील काही खेळणी अलास्काच्या किनाऱ्यावर जाऊन पोहचली. तर काही खेळणी बेरींगची सामुद्रधुनी पार करून इ.स.२००० पर्यंत आर्क्टिकडे वाहत गेली. त्यांतीलच काही खेळणी आर्क्टिकमधून अटलांटिक महासागराकडे वाहत येऊन त्यांच्या सोबतची काही खेळणी अटलांटिक महासागरातून वाहत येऊन इ.स.२००३ मध्ये नकाशात दाखविल्याप्रमाणे अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर येऊन पोहचली. तर काही खेळण्यांनी इ.स. २००७ पर्यंत चक्क युरोप खंडाचा पश्चिम किनारा गाठला. हवाई बेटांजवळून काही खेळणी ऑस्ट्रेलिया खंडाकडे देखील वाहत गेली.