सागरी प्रवाह

सागरी प्रवाहांचे मानवी जीवनावरील परिणाम

views

4:04
सागरसान्निध्य असलेल्या प्रदेशातील हवामानावर सागरी प्रवाहांचा विशेष परिणाम होतो. उष्ण सागरी प्रवाह थंड प्रदेशात ज्या किनारपट्टी जवळून वाहतात, तेथे हवामान उबदार बनते. काही प्रदेशांत पावसाचे प्रमाण वाढते. उदा. पश्चिम युरोप, दक्षिण अलास्का व जपानच्या किनाऱ्याजवळून वाहणाऱ्या उष्ण प्रवाहांमुळे तेथील थंडीची तीव्रता कमी होऊन हवामान उबदार बनले आहे. त्यामुळे त्याठिकाणी एवढया मोठया प्रमाणात थंडी असूनही तेथील बंदरे हिवाळयातही गोठत नाहीत. ? जर सागरी प्रवाह नसते तर सागराच्या पाण्याची हालचाल झाली नसती. त्यामुळे समुद्र व महासागरातील पाणी एकाच ठिकाणी साचून राहिले असते. त्यामुळे अशा एकाच ठिकाणी साचून राहिलेल्या पाण्यात सजीवांना आवश्यक असलेला खादयाचा पुरवठा झाला नसता. परिणामी सागरी जीवसृष्टी व तेथील परिसंस्था मर्यादित स्वरूपात राहिल्या असल्या. सजीवसृष्टी व परिसंस्था यांच्यावर जसा सागरी प्रवाहांचा परिणाम होतो, तशाच प्रकारचा परिणाम मानव व मानवी व्यवसायांवरही होत असतो. उष्ण व शीत प्रवाह जेथे एकत्र येऊन मिळतात, त्या भागात वनस्पती, शेवाळ, प्लवंक इत्यादींची वाढ होते. हे माशांचे खादय असते. त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणावर मासे येतात. त्यांचे प्रजनन होते. म्हणून अशा भागात मोठी मत्स्यक्षेत्रे निर्माण झालेली आहेत. उदा. अटलांटिक महासागरातील उत्तर अमेरिका खंडाजवळील ग्रँड बँक, युरोप खंडाजवळील डॉगर बँक ही त्यांची काही उदाहरणे आहेत.