सागरी प्रवाह

क्षितिज समांतर (पृष्ठीय) सागरी प्रवाह

views

4:48
क्षितीज म्हणजे जिथे आकाश जमिनीला टेकले आहे, असे वाटते ती काल्पनिक रेषा होय. तर अशा क्षितिजाला समांतर सागरी प्रवाहांविषयीची माहिती आता आपण घेणार आहोत. पृष्ठभागांवरील प्रवाहांतून म्हणजेच समुद्रसपाटीपासून ५०० मी. खोल प्रवाहांतून महासागरातील सुमारे १० टक्के पाणी वाहत असते. पृष्ठीय प्रवाहातून होणारा पाण्याचा विसर्ग स्वेड्रप या एककाने मोजला जातो. एक स्वेड्रप म्हणजे १०६ घनमीटर प्रतिसेकंद इतका पाण्याचा विसर्ग असतो. सागरजलाची क्षितिज समांतर हालचाल ही उष्ण आणि शीत प्रवाहांच्या स्वरूपात होते. नकाशात दाखविल्याप्रमाणे हे सागरी प्रवाह विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे व ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे वाहतात. हे प्रवाह मोठया प्रमाणावर ग्रहीय वाऱ्यांमुळे दूर अंतरापर्यंत ढकलले जातात. त्यामुळे महासागराचे पाणी विषुववृत्ताकडून दोन्ही ध्रुवांकडे व तेथून पुन्हा विषुववृत्ताकडे असे प्रवाहित होते. सागरी प्रवाह प्रामुख्याने सागरजलाचे तापमान, क्षारता, घनता व ग्रहीय वारे यांमुळे निर्माण होतात. याचबरोबर अजूनही काही गोष्टी सागरी प्रवाहांची वाहण्याची दिशा व त्यांचा वेग याला कारणीभूत ठरतात.