सागरी प्रवाह

माहीत आहे का तुम्हांला ?

views

2:33
पॅसिफिक व अटलांटिक महासागरांतील सागरी प्रवाह प्रणालीत सारखेपणा आहे. परंतु हिंदी महासागरातील प्रवाहचक्र जरा वेगळे आहे. हिंदी महासागर उत्तरेकडील बाजूस भूवेष्टित, म्हणजेच जमिनीने वेढलेला आहे. या महासागराचे विषुववृत्तामुळे उत्तर व दक्षिण असे दोन भाग होतात. या महासागरावर मान्सून वाऱ्यांचा मोठा प्रभाव आहे. हे वारे हंगामानुसार दिशा बदलत असतात. त्यामुळे उन्हाळयात उत्तर हिंदी महासागरात सागर प्रवाह घडयाळाच्या काटयाच्या दिशेने वाहतात, तर हिवाळ्यात ते विरुद्ध दिशेने वाहतात. खोलवर वाहणारे सागरी प्रवाह :- ५०० मीटरपेक्षा खोलीवरील सागरी जलातही प्रवाह असतात. या प्रवाहांना खोलवर वाहणारे सागरी प्रवाह असे म्हटले जाते. हे प्रवाह सहसा महासागरातील वेगवेगळ्या भागांतील पाण्याच्या तापमान व घनतेतील फरकामुळे तयार होतात. याला उष्णता-क्षारता अभिसरण म्हटले जाते. हे प्रामुख्याने महासागराच्या तळापर्यंत वाहणारे प्रवाह आहेत. हे सागरजलाच्या पृष्ठभागाखाली नदयांप्रमाणे वाहत असतात.