वाहतूक

वाहतुकीचे फायदे

views

3:19
मुलांनो, वाहतुकीचे जरी काही तोटे असले तरी वाहतुकीचे फायदे अधिक आहेत. ते फायदे पुढीलप्रमाणे आहेत:- • जलद वाहतुकीच्या साधनांचा वापर केल्याने कामे जलद गतीने होतात. • यामुळे वेळेची व श्रमाची बचत होते. • वाहतुकीच्या जलद साधनांमुळे व्यापार वाढीला चालना मिळते. उदा. ग्रामीण भागात एकत्रित केलेले दूध वाहतुकीची जलद साधने असल्यामुळे जलद गतीने मुंबई, पुणे शहरास पोहचविता येतात. त्यामुळे दुग्धव्यवसाय वाढीस लागतो. • वाहतुकीमुळे पर्यटन, आरोग्य आणि शिक्षण इ सुविधा गतिमान झाल्या आहेत, त्यामुळे त्यात प्रगती होऊन त्यांचा स्तर उंचावला आहे. वाहतुकीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे विविध वाहतुकींच्या सोयींमुळे संपूर्ण जग जवळ आले आहे. मुलांनो अशा प्रकारे वाहतुकीचे अनेक फायदे आपल्याला माहीत आहेत. तुम्हांला आणखी काही फायदे माहीत आहेत का? मुलांनो, हे चित्र नीट पाहा आणि पुढील प्रश्नांची उत्तरे दया. 1. चित्रातील मुले कोठे थांबली आहेत? 2. तिथे ती कशासाठी थांबली असावीत? 3. चित्रातील मुले काय करत आहेत? 4. त्या मुलांना कशामुळे त्रास होत असावा?