वाहतूक

सांगा पाहू

views

5:14
मुलांनो, वाहतुकीच्या साधनांचे किंवा वाहतुकीचे चांगले व वाईट अशा दोन्ही प्रकारचे परिणाम आपण पाहिले त्यांचा आधार घेऊन पुढील प्रश्न सोडवा. 1) पायी जाणे. 2) सायकलवरून जाणे. 3) खाजगी वाहनाने जाणे. 4) सार्वजनिक वाहनाने जाणे. मुलांनो इथे काही प्रसंग दिले आहेत. त्या प्रसंगास जाण्यासाठी तुम्ही वरीलपैकी कोणता पर्याय कोणत्या प्रसंगासाठी निवडाल ते सांगा. मुलांनो, वरील पर्याय तुम्ही अगदी बरोबर सांगितले. यावरून आपल्या असे लक्षात येते की जवळच्या अंतरासाठी आपण पायी गेले पाहिजे. तर अंतर थोडे दूरचे असले व आपल्या सोबत थोडेच साहित्य असेल, आपण ते सायकलवरून नेऊ शकत असू तर अशावेळी सायकलचा उपयोग केला पाहिजे. अशा सवयी आपण नेहमीसाठी लावून घेतल्या पाहिजेत. हे आपण सर्वांनी अमलात आणणे गरजेचे आहे. असे केल्याने वाहतुकीच्या वाईट परिणामांचे जे वाढते प्रमाण आहे. ते आपण कमी करू शकतो.