वाहतूक

हे चित्र पहा. पानाचा तजेलदारपणा

views

5:08
मुलांनो, या चित्रात तुम्हांला रस्ता, रस्त्यावरील वाहने व रस्त्याच्या कडेला व रस्त्यापासून दूरवर असलेल्या वनस्पतीं दिसत आहेत. पानाचा तजेलदारपणा :- पहा, रस्त्याच्याकडेला ज्या वनस्पती आहेत त्यांच्या पानांना तजेलदारपणा नाही. तर रस्त्यापासून दूरवर असलेल्या वनस्पतींची पाने ताजी टवटवीत दिसत आहेत. ती पाने तजेलदार आहेत. पानांचा रंग :- रस्त्याकडील वनस्पतींच्या पानांचा रंग काळवंडला आहे. तर रस्त्यापासून दूरवर असलेल्या वनस्पतींच्या पानांचा रंग हिरवागार आहे. वनस्पतीचे स्वरूप :- रस्त्याकडील वनस्पतींत तजेलदारपणा नाही. त्या खुरटया आहेत. त्यांची म्हणावी तशी वाढ झालेली नाही. तर रस्त्यापासून दूरवर असलेल्या वनस्पती दाट आहेत. त्या हिरव्यागार व तजेलदार आहेत. हवेच्या प्रदूषणामुळे प्राणी व वनस्पतींवर होणारे परिणाम : 1) हवा प्रदूषणामुळे लोकांच्या आरोग्याला धोका संभवतो. श्वासनलिका, डोळे व फुफ्फुसांचे विकार होतात. उदा. डोळे जळजळणे, श्वास घेताना धाप लागणे, दम लागणे इ. हे प्रकार घडतात. अशा प्रकारे मुलांनो वाहतुकीचे वाईट परिणामही आहेत. तसेच भरमसाठ इंधनांचा वापर केल्यामुळे अजून काही वर्षांत इंधनाचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. यांसारखे अजून काही परिणाम सांगता येतील.