वाहतूक

हे नेहमी लक्षात ठेवा

views

5:02
मुलांनो, आपले पर्यावरण खूप संवेदनशील आहे. नेहमीच्या नियमापेक्षा जरा जरी काही वेगळे पर्यावरणामध्ये झाले, की त्याचा मोठा परिणाम पर्यावरणातील सजीवांवर होत असतो. तसेच आपण पाहिले की रस्त्याकडील वनस्पतींवर कसा प्रदूषणाचा वाईट परिणाम होतो. असे वाईट परिणाम पर्यावरणावर प्रदूषणामुळे होतात. ते परिणाम आपल्यासह सर्व सजीवांसाठी हानिकारक असतात. म्हणून प्रदूषण, मग ते कोणत्याही प्रकारचे असो ते टाळणे अत्यंत गरजेचे आहे. मुलांनो, आज तंत्रज्ञानाने खूप प्रगती केली असल्यामुळे आजच्या आधुनिक युगात आपण पेट्रोल, डिझेल, नैसर्गिक वायू (गॅस) या इंधनावर चालणारी वाहने, जहाजे व विमाने वापरत आहोत. यापूर्वी वापरात असलेली जहाजे अशा प्रकारच्या यंत्रांवर चालत नसत. ही जहाजे वाऱ्याच्या वेगाचा वापर करून चालवली जात असत. याला शिडाचे गलबत किंवा जहाज म्हणत. प्राचीन काळी अशा गलबतांचा वापर करून प्रवास करीत असत. आपल्याला ज्या दिशेने जायचे असेल त्या दिशेने वारा वाहत असेल तर शीड उभारले जाई. वारा विरुद्ध दिशेने वाहत असल्यास शीड खाली उतरवले जाई.