सविनय कायदेभंग चळवळ

पेशावरचा सत्याग्रह

views

4:56
गांधीजींनी सुरू केलेल्या सविनय कायदेभंग चळवळीचे पडसाद संपूर्ण देशभर उमटू लागले. पेशावर या शहरामध्येही असाच सत्याग्रह सुरू झाला. पेशावर हे शहर आजच्या पाकिस्तानमध्ये आहे. भारताच्या वायव्येस पेशावरमध्ये गांधीजींचे निष्ठावान अनुयायी होते. गांधीजींना व त्यांच्या विचारांना मानणारे असे एक कट्टर गांधी समर्थक तिथे होते. त्यांचे नाव खान अब्दुल गफारखान असे होते. त्यांना सरहद्द गांधी म्हणून ओळखले जाते. त्यांनी खुदा – इ - खिदमतगार या संघटनेची स्थापना केली. २३ एप्रिल १९३० रोजी त्यांनी पेशावर येथे सत्याग्रह सुरु केला. पेशावर हे शहर सुमारे आठवडाभर सत्याग्रहींच्या ताब्यात होते. सरकारने गढवाल पलटणीला सत्याग्रह करणाऱ्या लोकांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले. परंतु गढवाल पलटणीचे अधिकारी चंद्रसिंग ठाकूर यांनी सत्याग्रहींवर गोळीबार करण्यास नकार दिला. त्यामुळे ब्रिटिश सरकारच्या लष्करी न्यायालयाने त्यांना जबर शिक्षा दिली. संपूर्ण देशात ठिकठिकाणी आंदोलने झाली, मोर्चे निघू लागेल. त्यामुळे ब्रिटिश सरकार अडचणीत आले. हजारो सत्याग्रही व शेकडो नेते तुरुंगात जाऊ लागले. ४ मे १९३० रोजी गांधीजींना अटक करण्यात आली. ब्रिटिश सरकारने ही चळवळ दडपण्याचा प्रयत्न सुरु केला. गांधीजींना अटक केल्यामुळे जनतेच्या असंतोषात आणखीनच भर पडली. गांधीजींच्या अटकेचा निषेध देशभर करण्यात येऊ लागला.