सविनय कायदेभंग चळवळ

गोलमेज परिषद

views

4:39
सविनय कायदेभंग आंदोलन सुरू असतानाच भारताशी संबंधित घटनात्मक प्रश्नांचा विचार करावा असे ब्रिटनचे प्रधानमंत्री रॅम्से मॅक्डोनाल्ड यांचे मत होते. याकरिता त्यांनी लंडनमध्ये एका परिषेदेचे आयोजन केले होते. या परिषदेला गोलमेज परिषद असे म्हटले जाते. १९३० ते १९३२ या तीन वर्षांच्या कालावधीत तीन गोलमेज परिषदांचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रत्येक गोलमेज परिषदेची माहिती आपण करून घेऊ. पहिली गोलमेज परिषद: ही लंडन येथे ब्रिटनचे प्रधान मंत्री रॅम्से मॅक्डोनाल्ड यांच्या अध्यक्षतेखाली नोव्हेंबर १९३० मध्ये भरविण्यात आली. या परिषदेला भारत तसेच इंग्लंडमधील एकंदर ८९ प्रतिनिधी जमले होते. भारतातील विविध संस्थांनी १६ प्रतिनिधी पाठविले होते. राष्ट्रीय सभा सोडून हिंदुस्थानात असलेल्या इतर राजकीय संघटनांचे प्रतिनिधी होते. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सर तेजबहादूर सप्रू, बॅरिस्टर जीना यांसारख्या नेत्यांचा सहभाग होता. तसेच विविध राष्ट्रीय पक्ष व संस्थानिकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मात्र राष्ट्रीय सभेने यावर पूर्णत: बहिष्कार टाकला. राष्ट्रीय सभा हीच देशाची प्रतिनिधिक संस्था होती. देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रीय सभेच्या सहभागाशिवाय गोलमेज परिषदेतील चर्चा निष्फळ ठरली. तरीही या परिषदेत केंद्रीय स्तरावर जबाबदार शासन पद्धती, भारतात संघराज्याची स्थापना अशा विविध विषयांवर चर्चा झाली.