सविनय कायदेभंग चळवळ Go Back पुणे करार views 3:35 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदांमध्ये दलितांचे प्रतिनिधित्व केले. तेथे त्यांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली. कायदेमंडळात मिळणाऱ्या जागांविषयी हिंदी प्रतिनिधींमध्ये दुसऱ्या गोलमेज परिषदेत एकमत न झाल्याने पंतप्रधान रॅम्से मॅक्डोनाल्ड यांनी आपला निर्णय १६ ऑगस्ट १९३२ रोजी जाहीर केला. तो जातीय निवाडा या नावाने प्रसिद्ध आहे. त्यानुसार दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ जाहीर करण्यात आले. जातीय निवाड्यानुसार हिंदू समाजाची झालेली विभागणी गांधीजींना मान्य नव्हती. अस्पृश्यांना हिंदूंपासून वेगळे करणाऱ्या या निवाड्याविरुद्ध महात्माजींनी येरवडा तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले. अस्पृश्य पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मन वळविण्यात आले. राष्ट्रीय सभेच्या नेत्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या मागणीचा परत विचार करावा अशी विनंती केली. देशाचे हित लक्षात घेऊन डॉ. आंबेडकरांनी ही मागणी मान्य केली. १९३२ मध्ये महात्मा गांधी आणि आंबेडकर यांच्यात पुणे येथे एक करार झाला. हा करार ‘पुणे करार’ म्हणून प्रसिद्ध आहे. या करारानुसार असे ठरले की, अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ असू नयेत. त्याऐवजी त्यांना राखीव जागा मिळाव्यात. डॉ. आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यात झालेल्या या करारास सरकारने आपली मान्यता दिली. मिठाचा सत्याग्रह पेशावरचा सत्याग्रह धारासना सत्याग्रह गोलमेज परिषद पुणे करार