सविनय कायदेभंग चळवळ

धारासना सत्याग्रह

views

3:52
गुजरात राज्यातील धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केले. मिठाचा कायदा मोडण्यासाठी निघालेल्या सत्याग्रहींवर पोलिसांनी लाठीमार केला. एवढा लाठीमार होऊनही सत्याग्रहींनी गांधीजींचे अहिंसेचे तत्त्व सोडले नाही. हल्ल्यात जखमी झालेल्यांना औषधोपचारासाठी घेऊन गेल्यावर त्याठिकाणी सत्याग्रहींची दुसरी तुकडी सत्याग्रह करण्यासाठी पुढे येत असे. असे अखंडपणे सुरू होते. या सत्याग्रहापासून जगाने गांधी व त्यांचे विचार मान्य करण्यास सुरुवात केली. महाराष्ट्रात वडाळा, मालवण, शिरोडा याठिकाणी मिठाचे सत्याग्रह झाले. जेथे मिठागरे नव्हती अशा ठिकाणी लोकांनी इंग्रज सरकारचे जंगलविषयक कायदे मोडायला सुरुवात केली. महाराष्ट्रात बिळाशी, अकोला, संगमनेर (नगर), कळवण, चिरनेर (रायगड), लोहार (चंद्रपूर), सोलापूर इ. ठिकाणी जंगल सत्याग्रह झाले. बिळाशी येथील जंगल सत्याग्रह प्रचंड गाजला. त्याशिवाय यवतमाळमधील पुसद येथील सत्याग्रहही प्रसिद्ध आहे.