सशस्त्र क्रांतिकारी चळवळ Go Back प्रस्तावना views 4:18 आतापर्यंत आपण पाहिले की ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध भारतात वेगवेगळ्या मार्गांनी आंदोलने झाली. त्यांतील एक मार्ग सशस्त्र क्रांतीचा होता. त्याचा अभ्यास आपण या पाठात करणार आहोत. सन १८५७ च्या उठावापूर्वीही भारतात इंग्रजी सत्तेविरुद्ध झालेले उठाव आपण पाहिले. सन १७६३ ते १८५७ या काळात बंगालमध्ये प्रथम संन्याशांच्या व त्यानंतर फकिरांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी लढे दिले. उमाजी नाईकांनी महाराष्ट्रात दिलेला लढा, १८०६ साली वेल्लोर येथे तर १८२४ साली झालेला बराकपूरचा उठाव यांची आपण माहिती करून घेतली. १८५७ च्या उठावानंतर रामसिंह कुका यांनी पंजाबमध्ये सरकारविरोधी उठावाचे आयोजन केले होते. या पाठात आपण सशस्त्र क्रांतिकारी चळवळीबद्दल माहिती घेणार आहोत. प्रस्तावना अभिनव भारत बंगालमधील क्रांतिकारी चळवळ इंडिया हाऊस काकोरी कट चितगाव शस्त्रागारावरील हल्ला