सशस्त्र क्रांतिकारी चळवळ Go Back काकोरी कट views 5:03 सरकारच्या दडपशाहीने क्रांतिकारी चळवळ संपुष्टात आली नाही तर ती आणखीच वाढली. सरकारच्या जुलमी कृत्यांचा प्रतिकार म्हणून महात्मा गांधीजींनी अहिंसेवर आधारित असहकाराची चळवळ सुरु केली होती. गांधीजींनी असहकार चळवळ थांबविल्यानंतर अनेक तरूण क्रांतिमार्गाकडे वळले. चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, योगेश चटर्जी, सचिंद्रनाथ संन्याल इ. क्रांतिकारक एकत्र आले. क्रांतिकार्याला लागणारी शस्त्रास्त्रे मिळविण्यासाठी क्रांतिकारकांना पैसा हवा होता. त्यासाठी रामप्रसाद बिस्मिल यांच्या नेतृत्वाखाली रेल्वेतून नेला जाणारा सरकारी खजिना ९ ऑगस्ट १९२५ रोजी काकोरी या उत्तर प्रदेशातील रेल्वे स्टेशन जवळ त्यांनी लुटला. यालाच ‘काकोरी कट’ म्हटले जाते. सरकारने लगेच कारवाई करून क्रांतिकारकांना अटक केली. त्यांच्यावर खटले चालविण्यात आले. अशफाक उल्ला खान, रामप्रसाद बिस्मिल, रोशन सिंग, राजेंद्र लाहिरी यांना फाशी देण्यात आली. इतर अनेकांना वेगवेगळ्या कठोर शिक्षा देण्यात आल्या. चंद्रशेखर आझाद मात्र पोलिसांच्या हाती सापडले नाहीत. प्रस्तावना अभिनव भारत बंगालमधील क्रांतिकारी चळवळ इंडिया हाऊस काकोरी कट चितगाव शस्त्रागारावरील हल्ला