अंकगणिती श्रेढी

सोडवलेली उदाहरणे

views

5:47
आपण काही उदाहरणे सोडवून बघू व समजून घेवूया. उदा:1) खालील पैकी कोणती क्रमिका अंकगणिती श्रेढी आहे हे ओळखा व तिची पुढची दोन पदे काढू. a) 5,12,19,26 ही क्रमिका अंकगणिती श्रेढी आहे की नाही हे ओळखण्यासाठी आपल्याला यातील सामाईक फरक सारखा येतो की नाही हे बघावे लागेल. येथे t1=5, t2=12, t3=19, t4=26…………आहे. आता आपण यातील सामाईक फरक काढू. t 2 - t1 = 12 - 5 = 7 (येथे t2 =12 आहे आणि t1=5 आहे. यांची वजाबाकी 7 येईल) t 3 - t2 = 19 - 12 = 7 (येथे t3 =19 आहे आणि t2=12 आहे. यांची वजाबाकी 7 येईल) t4- t3 = 26 - 19 = 7 (येथे t4 =26 आहे आणि t3=19 आहे. यांची वजाबाकी 7 येईल) म्हणजेच या क्रमिकेतील सामाईक फरक सारखाच किंवा समान आहे. पहिले पद=5 व सामान्यफरक(ɗ)=7 आहे तो स्थिर आहे. म्हणून ही क्रमिका अंकगणिती श्रेढी आहे. आता या श्रेणीतील पुढील दोन पदे काढूया. 26 + 7=33, 33 + 7=40 म्हणून 33 व 40 ही दिलेल्या श्रेढीतील पुढची दोन पदे आहेत. अजून आपण काही उदाहरणे सोडवून पाहूया.