चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार

उदाहरणे

views

3:57
आता आपण आयत, चौरस व समभूज चौकोनाच्या गुणधर्मांवरून काही उदाहरणे सोड्वूया. उदा. 1) आयत ABCD च्या कर्णाचा छेदनबिंदू P आहे. जर ℓ(AB) = 8 सेमी, तर ℓ(DC) = किती? तसेच जर ℓ(BP) = 8.5 सेमी आहे तर ℓ(BD) आणि ℓ(BC) = किती? आपण एक कच्ची आकृती काढून सर्व माहिती त्यामध्ये मांडून घेवू. पक्की आकृती काढण्यासाठी उदाहरणामध्ये बाजू AB= 8 सेमी आहे व बाजू DC ची लांबी विचारली आहे. तुम्हांला माहीतच आहे की, आयताच्या संमुख बाजू समान असतात. म्हणून जर बाजू AB= 8 सेमी असेल तर बाजू DC सुद्धा 8 सेमी असेल. म्हणून, ℓ(AB) = 8 सेमी = ℓ(DC) = 8 सेमी. तसेच रेख (BP) = 8.5 सेमी दिली असून कर्ण BD चे माप काढायचे आहे. मुलांनो आयताच्या गुणधर्मानुसार आयताचे कर्ण परस्परांना दुभागतात. म्हणजे रेख BP ची लांबी जेवढी असेल त्याच्या दुप्पट कर्ण BD ची लांबी असेल.