चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार

समांतरभुज चौकोन

views

4:24
आपण समांतरभूज चौकोन म्हणजे काय व त्याचे गुणधर्म काय आहेत ते अभ्यासूया. ज्या चौकोनाच्या संमुख भूजा परस्परांना समांतर असतात त्या चौकोनाला ‘समांतरभूज चौकोन’ असे म्हणतात. समांतर भूज चौकोन कसा काढता येईल ते या शेजारील आकृतीत पाहून काढा. यावरून आपल्याला एक गुणधर्म समजतो. समांतरभूज चौकोनाच्या लगतच्या कोनांच्या जोडया परस्पर पूरक असतात. समांतरभूज चौकोनाचे इतर गुणधर्म या आकृतीवरून समजून घेऊ. 1) समांतर भूज चौकोनाचे संमूख कोन एकरूप असतात. म्हणजेच त्यांची मापे समान असतात. उदा. m BAD व त्याच्या समोरचा कोन m BCD आहे. व ते एकरूप आहेत. ABC व ADC हे परस्परांचे समोरील व एकरूप कोन आहेत. व त्यांची मापे समान आहेत. 2) समांतरभूज चौकोनाच्या संमुख भूजा समान लांबीच्या म्हणजे एकरूप असतात. वरील आकृतीत रेख AB च्या समोर रेख DC व रेख BC च्या समोर रेख AD आहे. म्हणून त्या बाजू एकरूप आहेत. त्यांची लांबी समान आहे. ∴ l(AB) = l(CD), व l(BC) = l(AD) आहे. 3) समांतरभूज चौकोनाचे कर्ण एकमेकांना दुभागतात. आकृतीत AC व रेख BD हे दोन कर्ण आहेत. हे दोन कर्ण परस्परांना O बिंदूमध्ये छेदतात. कर्ण AC चे माप हे रेख AO च्या दूप्पट असेल. ∴ l(OB) = l(OD) = ½ l (BD) आहे. आणि l(OA) = l(OC) = ½ l (AC) आहे.