चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार

उदाहरणे

views

5:38
समांतर भूज चौकोन, समलंब चौकोन व पतंग यांच्या गुणधर्मांवर आधारित आपण आता काही उदाहरणे सोडवूया. उदा.1) एका समांतरभूज चौकानाच्या लगतच्या कोनांची मापे (5 x -7) व (4 x + 25) आहेत तर त्या कोनांची मापे काढा. उकल: समांतरभूज चौकोनाचे लगतचे कोन पूरक असतात व त्यांची बेरीज 180० असते. यावरून येथे, (5 x - 7) + (4 x + 25) = 180० आहे. ∴ 4x + 5x – 7 + 25 = 180० ∴ 9 x + 18 = 180० ∴ 9x = 180 – 18 = 162 ∴ 9x = 162 ∴ x = 162/9 = 18 येथे आपल्याला x ची किंमत 18 मिळाली आहे. आता आपण ही x ची किंमत उदाहरणात ज्या ठिकाणी x आहे तेथे लिहू: पहिला कोन (5 x - 7) मध्ये x ची किंमत ठेवू. = 5 x 18 – 7 = 90 – 7 = 83. ∴ पहिल्या कोनाचे माप = 83० दुसरा कोन (4x + 25) मध्ये x ची किंमत लिहू. = 4 x 18 + 25 = 72 + 25 = 97 ∴ दूसऱ्या कोनाचे माप = 97० आहे.