सूट व कमिशन Go Back उदाहरणे views 3:38 सूट व कमिशन यावरील काही उदाहरणे आपण पाहूयात. उदा.1) एका पुस्तकाची छापील किंमत 360 रूपये आहे. दुकानदाराने ते पूस्तक 306 रूपयात विकले, तर त्याने शेकडा किती सूट दिली? उकल: वरील उदाहरणात छापील किंमत 360रू. व विक्री किंमत 306रू. दिली आहे. म्हणून सर्वप्रथम दुकानदाराने सूट किती दिली ते काढू. सूट = छापील किंमत- विक्री किंमत ∴ सूट = 360 – 306 = 54 रूपये. म्हणजे जेव्हा वस्तूची किंमत 360 असेल तेव्हा 54रू सूट मिळते. मग आपल्याला शेकडा किती सूट मिळाली हे काढायची आहे. म्हणून वस्तूची छापील किंमत 100 असेल तर सूट x मानू, = ( सूट )/(छापील किंमत) = ( x)/100 = 54/360 = ( x)/100 ∴ x = (54 x 100)/360 ∴ x = (54 x 10)/36 (54 व 36 या दोन्ही संख्यांना 9ने भाग जातो.) ∴ x = (6 x 10)/4 = 60/4 = 15. ∴ पुस्तकाच्या छापील किंमतीवर 15 रु. सूट दिली. प्रस्तावना उदाहरणे पुढील उदाहरणे कमिशन रिबेट