सूट व कमिशन Go Back कमिशन views 3:39 मुलांनो आता आपण कमिशन म्हणजे काय ते समजून घेऊ. वस्तूचे उत्पादन करणाऱ्या कंपनीला आपला माल स्वत: विकणे शक्य नसते. तेव्हा ती कंपनी काही व्यक्तींवर आपला माल विकण्याची जबाबदारी टाकते. उदा. पूस्तके, कापड, साबण इत्यादी. या सेवेबद्दल त्या व्यक्तीस काही मोबदला दिला जातो त्यास “कमिशन” असे म्हणतात. असे काम करणाऱ्या व्यक्तीस कमिशन एजंट म्हणतात. कमिशन हे शेकडेवारीत देण्यात येते. त्याचे दर वस्तूनुसार वेगवेगळे असतात. जमीन, भूखंड, घरे, गूरेढोरे यांच्या मालकांना वरील गोष्टीची विक्री करताना सहजासहजी ग्राहक मिळेलच असे नाही. त्यामूळे विकणारा व खरेदी करणारा यांना एकत्र आणण्याचे काम जी व्यक्ती करते तिला मध्यस्थ किंवा दलाल किंवा कमिशन एजंट म्हणतात. धान्य, भाजीपाला, फळे, फूले इत्यादी शेतमालाची विक्री ज्या मध्यस्थांमार्फत होते त्या व्यक्तीला दलाल किंवा अडत्या असे म्हणतात. या कामाबद्दल मध्यस्थाला जे कमिशन मिळते त्यास दलाली किंवा अडत म्हणतात. ही दलाली ज्याचा माल विकतो त्याच्याकडून किंवा जो माल खरेदी करतो त्याच्याकडून किंवा दोघांकडूनही मिळू शकते. मनीऑर्डरने पैसे पाठवताना पोस्टखाते आणि बँकेमार्फत पैसे पाठवताना बँक कमिशन आकारते. प्रस्तावना उदाहरणे पुढील उदाहरणे कमिशन रिबेट