सूट व कमिशन

रिबेट

views

4:14
आता आपण रिबेट म्हणजे काय ते समजून घेऊ. खादी ग्रामोदयोग भांडार, हातमाग दुकान, हस्तकला वस्तू विक्री केंद्र, महिला बचत गट इत्यादी संस्था काही विशेष प्रसंगानिमित्त ग्राहकांना सूट देतात. उदा. गांधीजयंती निमित्त खादीच्या कापडावर सूट दिली जाते. अशावेळी दुकानदाराला छापील किंमतीपेक्षा जेवढी रक्कम कमी मिळते, त्याची भरपाई शासन करते अशा योजनेखाली ग्राहकाला जी सूट मिळते तिला रिबेट म्हणतात. आयकर भरणाऱ्या ज्या व्यक्तीचे उत्पन्न ठरावीक मर्यादेपर्यंत असते. त्यांना आयकरात सूट मिळते. या सूटीलाही रिबेट म्हणतात. थोडक्यात रिबेट म्हणजे एक प्रकारची सूटच असते. ती विशिष्ट अटीनूसार मान्यताप्राप्त संस्था किंवा शासन यांच्याकडून दिली जाते.