सूट व कमिशन

पुढील उदाहरणे

views

4:01
तसेच काही पुढील उदाहरणाचा आपण अभ्यास करणार आहोत. उदा. 3) छापील किमतीवर 20% सूट देवून एक साडी 1120 रूपयांस विकली तर त्या साडीची छापील किंमत किती होती? उकल: मुलांनो, या उदाहरणात छापील किंमत दिली नाही. समजा छापील किंमत 100 रूपये मानू. त्यावर 20% सूट दिली म्हणजेच ग्राहकाला ती साडी 100 – 20 = 80 रूपयांना विकली. म्हणजेच जेव्हा विक्री किंमत 80 रूपये असेल तेव्हा छापील किंमत 100 रुपये असेल. इथे विक्री किंमत 1120 रू दिली आहे. आणि छापील किंमत काढायची आहे. म्हणून छापील किंमत x मानू आणि गुणोत्तर लिहू. ∴ 80/100 = 1120/x ∴ x = (1120 x 100)/80 ∴ x = (1120 x 10)/8 ∴ x = 11200/8 = 1400 म्हणजेच त्या साडीची छापील किंमत 1400 रुपये आहे. उदा. 4) दुकानदार एक वस्तू काही किमतीला विकायचे असे मनाशी ठरवतो आणि वस्तूची किंमत त्याने ठरवलेल्या किंमतीपेक्षा तो 30% वाढवून छापतो. वस्तू विकताना ग्राहकांना 20% सूट देतो. तर दुकानदारास त्याने ठरवलेल्या किमतीपेक्षा किती टक्के अधिक किंमत मिळते. उकल: किमतीतील वाढ तसेच जास्तीचा नफा यांची टक्केवारी ठरवलेल्या किमतीवर अवलंबून असते. म्हणून ठरलेली किंमत 100 रू मानल्यास उदाहरण सोडविण्यास सोपे जाईल. ∴ ठरवलेली किंमत = 100 रुपये मानू 30% वाढवून छापतो म्हणून छापील किंमत = 130 रूपये होईल. सूट = 130 चे 20% = 130× 20/100 = 26 रू. ∴ एकूण 26 रूपये सूट मिळाली. मग आता आपण विक्री किंमत काढूया. विक्री किंमत = 130 – 26 = 104 रुपये असेल. म्हणून जर ठरवलेली किंमत 100 रूपये असेल तर त्याला 104 रूपये मिळतील. म्हणजेच दुकानदाराला त्याने ठरवलेल्या किमतीपेक्षा 4% अधिक किंमत मिळते. लक्षात ठेवा सूट = छापील किंमत – विक्री किंमत असते. जर सूट शेकडा x असेल तर ( x)/100 = ( मिळालेली सूट)/(छापील किंमत) असते.