प्रदूषण

प्रदूषण

views

4:46
प्रदूषण (Pollution) : प्रदूषणाची सरळ सरळ व्याख्या करायची तर आपण असे म्हणू शकतो: ‘मानवाच्या हस्तक्षेपामुळे नैसर्गिक परिसंस्थेच्या पर्यावरणाची हानी होणे म्हणजेच प्रदूषण होय.’ आपण असेही म्हणू शकतो की “नैसर्गिक पर्यावरणाचे परिसंस्थेला हानिकारक असे दूषितीकरण म्हणजे प्रदूषण होय’’. याच प्रदूषणाला दूषितीकरण असेही म्हटले जाते. प्रदूषणाचे हवाप्रदूषण, जलप्रदूषण, वायुप्रदूषण असे विविध प्रकार आपल्याला सांगता येतील. प्रदूषके (Pollutants): मुलांनो, आता आपण प्रदूषकांविषयी माहिती करून घेऊ या. प्रदूषण घडवून आणणाऱ्या घातक घटकाला आपण प्रदूषके असे म्हणतो. तुम्हाला माहीत आहे की, परिसंस्थेचे कार्य हे नैसर्गिक रीतीने चालते. मात्र या कार्यात अडथळा आणणा-या, अजैविक व जैविक घटकांवर घातक परिणाम करणाऱ्या घटकांना प्रदूषके म्हणतात. हीच प्रदूषके वातावरणात जास्त प्रमाणात सोडली तर वनस्पती, प्राणी, मानवी जीवन यांच्यावर खूप घातक परिणाम होतो. परिसंस्था मोडकळीस येते. प्रदूषके ही नैसर्गिक व मानवानिर्मित असतात. मात्र नैसर्गिक प्रदूषके ही कालांतराने नष्ट होऊन जातात. तर मानवनिर्मित प्रदूषके नष्ट होत नाहीत. त्यामुळे सजीवसृष्टीला खूप मोठे नुकसान सोसावे लागते.