प्रदूषण

मृदा प्रदूषणाचा हवा तसेच जलप्रदूषण यांच्याशी असणारा संबंध

views

3:14
तुम्ही नेहमी पाहता की ओल्या कचऱ्याचे खतात रूपांतर केले नाही तर कचरा सडतो, कुजतो. त्यामुळे त्यातून विविध रोगजंतूंची वाढ होते. हेच रोग जंतू पावसाने वाहत्या पाण्याबरोबर वाहत जाऊन जलसाठ्यात मिसळतात. त्यामुळे पाणी प्रदूषण होते. तसेच शेतीमध्ये जास्त उत्पादन व्हावे यासाठी रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वापर केला जातो. त्यामुळे मृदाप्रदूषण मोठया प्रमाणात होते. त्याचप्रमाणे कीटकनाशके, तणनाशके यांचा जास्त प्रमाणात वापर केला तर फवारणीद्वारे ही रसायने हवेत मिसळतात व हवा प्रदूषण होते. तसेच रासायनिक खतांचा वापर जास्त प्रमाणात केल्यास ही रसायने पाण्यात मिसळतात व पाणी प्रदूषण होते. मानवी मलमुत्र, पशु, पक्षी यांची विष्ठा मातीत मिसळल्यामुळे मृदा प्रदूषण होते. ही घाण तेथे तशीच राहिल्यास त्यातून वेगवेगळे वायू पसरतात व दुर्गंधी पसरते. हेच वायू हवेत मिसळतात आणि हवा प्रदूषित होते. हीच घाण पाण्यात मिसळली की पाणी प्रदूषण होते. अशा प्रकारे मृदा प्रदूषणाचा हवा, तसेच जलप्रदूषण यांच्याशी असणारा सबंध सांगता येईल. आता आपण या प्रदूषणाचे प्रतिबंध व नियंत्रण याविषयी माहिती अभ्यासूया.