प्रदूषण

हवा प्रदूषणावर प्रतिबंधात्मक उपाय

views

5:15
हवा प्रदूषणावरील प्रतिबंधात्मक उपायांची माहिती आपण आता घेऊया १) कारखान्यातून बाहेर पडणा-या धुरामध्ये दूषित कण असतात व त्यामुळे हवा दूषित होते. त्यासाठी हवेचे प्रदूषण नियंत्रित करणा-या यंत्रणा कारखान्यामध्ये बसवणे बंधनकारक करावे. आणि त्या यंत्रणा बसवल्यानंतरही वेळोवेळी त्यांच्या तपासण्या व्हाव्यात. उदा: हवा प्रदूषण रोखण्यासाठी निरोधक यंत्रणा (Arresters), गाळणी यंत्र (Filters) यांचा उपयोग केला पाहिजे. २) शहरात, गावात, ओला कचरा सडल्यामुळे दुर्गंधी पसरते त्यासाठी त्या कच-याची योग्य प्रमाणात विल्हेवाट लावली पाहिजे. उदा. ओल्या कच-यापासून खतनिर्मिती प्रकल्प उभे करायला हवेत. ३) आण्विक चाचण्या, रासायनिक अस्त्रे यांचा वापर करताना त्यावर योग्य नियंत्रण ठेवले पाहिजे. 4) CFC निर्मितीवर बंधने घातली पाहीजेत. CFC म्हणजे क्लोरोफ्लोरोकार्बन हा एक प्रकारचा कार्बनयुक्त गॅस आहे व तो हवा प्रदूषित करण्यास कारणीभूत ठरतो. अशा प्रकारे आपण काही प्रतिबंधात्मक उपाय करून हवेचे प्रदूषण कमी करू शकतो.