प्रदूषण

जलप्रदूषके

views

6:01
जलप्रदूषके तीन प्रकारची असतात. जैविक जलप्रदूषके: शैवाल,जीवाणू, विषाणू यांच्यामुळे पाणी पिण्यायोग्य राहत नाही. यांच्यामुळे पाणी दूषित होते व रोग पसरतात. असेंद्रिय जलप्रदूषके: बारीक वाळू, धूलिकण, मातीचे कण, क्षारांचा साका, आर्सेनिक, कॅडमिअम, शिसे, पारा, यांची संयुगे व किरणोत्सारी पदार्थांच्या अंशाला असेंद्रिय जलप्रदूषके असे म्हणतात. सेंद्रिय जलप्रदूषके: तणनाशके, कीटकनाशके, खते, सांडपाणी, कारखान्यातील उत्सर्जक पदार्थ इत्यादी पाण्यात मिसळून पाणी दूषित होते. यांना सेंद्रिय जलप्रदूषके असे म्हणतात. पाणी प्रदूषणाची कारणे : जल प्रदूषणाची कारणे ही नैसर्गिक तसेच मानवनिर्मित असतात. तर सर्वप्रथम आपण नैसर्गिक कारणांचा आढावा घेऊया. नैसर्गिक कारणे व परिणाम: जलपर्णीची वाढ :- तुम्हाला पाण्यावर जलपर्णी वनस्पती वाढताना दिसत असेल. या जलपर्णीमुळे १. पाण्यात असणारा प्राणवायू कमी होतो २. पाण्याचा नैसर्गिक गुणधर्म बदलतो. कुजणारे पदार्थ :- प्राणी, वनस्पती, किंवा सजीव मृत झाल्यानंतर त्यांचे अवशेष सडतात किंवा कुजतात व ते पाण्यात मिसळून पाणी दूषित होते. गाळामूळे: नदी उतारावरून वाहत येताना सोबत गाळ वाहून आणते. गाळामुळे नदीचे पाणी प्रदूषित होते. काही वेळा नदीचे पात्र बदलल्यामुळेही गाळामुळे नदीचे पाणी प्रदूषित होते. काही वेळा नदीचे पात्र बदलल्यामुळेही गाळामुळे प्रदूषण होते.