क्षेत्रफळ

समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ

views

4:16
आता आपण समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ कसे काढतात ते पाहूया. प्रथम रेख AB II (समांतर) रेख DC असेल असाABCD हा समलंब चौकोन काढा. रेख AP ⊥ (लंब) बाजू DC आणिरेख BQ ⊥ (लंब) बाजू DC काढा. l (AP) = l (BQ) = h मानू, समलंब चौकोनाची उंची(h) ही समांतर रेषेमधील अंतर असते. पहा मुलांनो, लंब काढल्यामूळेABCD या चौकोनाचे 3 भाग झाले. त्यांपैकी ∆DPA व ∆CQB हे दोन काटकोन त्रिकोण आहेत. आणि ABQP हा आयत तयार झाला आहे. बिंदू P a Q हे रेख DC वर आहेत. ∴ समलंब चौकोन ABCD चे क्षेत्रफळ= A(∆APD) + A(APQB) + A(∆BQC) = (1 )/(2 ) × l(DP) x h + l (PQ) x h + (1 )/(2 )x l(QC) × h (येथे काटकोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे सूत्र व आयताच्या क्षेत्रफळाचे सूत्र वापरले आहे. आपण आधीच पहिले आहे की AP व BQ यासाठी h उंची घेतली आहे.) = h = [(1 )/(2 ) × DP + PQ + (1 )/(2 ) × QC] (h कंसाबाहेर काढला.) = (1 )/(2 ) x h x [l (DP) + 2 l(PQ) + l (QC)] = (1 )/(2 ) x h x [l (DP) + l(PQ) + l (AB) + l (QC)] ........l (PQ) = l (AB) कारण आयताच्या समोरासमोरील बाजू समान असतात. ∴ (1 )/(2 ) x h x [l(DP) + l(PQ) + l(QC) + l(AB)] l(DP), l(PQ), l(QC), = DC चे घटक आहेत. म्हणून या सर्वांसाठी DC हे घेवू. = (1 )/(2 ) x h x [l(DC) + l(AB)] यावरून A(ABCD) = (1 )/(2 ) x समांतर बाजूंच्या लांबीची बेरीज x उंची हे सूत्र आपल्याला मिळते. आता आपण समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाच्या सूत्रावर आधारित उदाहरण समजून घेवूया.