क्षेत्रफळ Go Back वर्तुळाचे क्षेत्रफळ views 3:01 आता आपण वर्तुळाचे क्षेत्रफळ कसे काढतात ते पाहूया. एका जाड कागदावर एक वर्तुळ काढा. वर्तुळाकार भाग कापून वेगळा करा. घड्या घालून त्याचे 16 किंवा 32 समान भागात विभाजन करा. आता ते सर्व भाग आकृतीत दाखवल्याप्रमाणे जोडून घ्या. पहा, यातून आयताकार आकृती तयार झालेली दिसत आहे. वर्तुळाच्या समान भागांची संख्या जेवढी जास्त असेल तेवढी आकृती अधिकाधिक आयताकार होईल. वर्तुळाचा परीघ = 2πr∴ आयताची लांबी π r, म्हणजेच अर्धपरिघाएवढी आणि रुंदी r एवढी आहे. वर्तुळाचे क्षेत्रफळ = आयाताचे क्षेत्रफळ = लांबी x रुंदी= πr x r= πr2 ∴ वर्तुळाचे क्षेत्रफळ = πr2मग आता याच सूत्राचा वापर करून आपण वर्तुळाचे क्षेत्रफळ काढूया. सूत्रावर आधारित काही उदाहरणे सोडवूया. प्रस्तावना समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ त्रिकोणाचे क्षेत्रफळ उदाहरण 2 अनियमित आकाराच्या जागेचे क्षेत्रफळ वर्तुळाचे क्षेत्रफळ