पृष्ठफळ व घनफळ

गोलाचे पृष्ठफळ

views

03:49
एक मोसंबे घेऊन त्याचे दोन अर्धे भाग करा. एक भाग कागदावर पालथा ठेवून, भोवती पेन्सिल फिरवून वर्तुळ काढा. अशी एकूण चार वर्तुळे काढा. आता मोसंब्याच्या चार समान फोडी करा. प्रत्येक फोडीच्या सालीचे लहान लहान तुकडे करा. एक वर्तुळ त्या तुकड्यांनी जवळपास भरता येते हे अनुभवा. चारही वर्तुळे पूर्ण भरतील. उदा 1) एका गोलाची त्रिज्या 7 सेमी आहे. तर त्या गोलाचे वक्रपृष्ठफळ काढा. (π = 22/7) घ्या. उदा 2) वक्रपृष्ठफळ 1256 चौसेमी असणाऱ्या गोलाची त्रिज्या काढा. (π=3.14). एक शंकू व एक अर्धगोल असे घ्या की, अर्धगोलाची त्रिज्या व शंकूची उंची समान असेल, तसेच शंकूची तळाची त्रिज्या व अर्धगोलाची त्रिज्या समान असावी. शंकू वाळूने पूर्ण भरा. पूर्ण भरलेला शंकू अर्धगोलात ओता. अर्धगोल पूर्ण भरण्यासाठी किती शंकू लागतात ते पाहा.