कालमापन

प्रस्तावना

views

4:11
मुलांनो कालमापनाचा अभ्यास आपण चौथीपासून करत आलोय. आठवड्याचे दिवस, वर्षाचे महिने , तसेच वेळेचे वाचन, घड्याळात किती वाजले? या सर्वांचा अभ्यास आपण केला आहे .मागील इयत्ते मध्ये आपण फक्त घड्याळातील दोन काट्यांचा अभ्यास केला. तास काटा व मिनिट काटा. तसेच 1 मिनिट= 60 सेकंद आणि 60 मि म्हणजे 1 तास हे आपल्याला माहीत आहे. 4 थी मध्ये आपण साडे,सव्वा ,पावणे ,दीड ,अडीच म्हणजे काय ते आपण पाहिले. आता त्यावर आधारित काही उदाहरणे उजळणी म्हणून घेवू या.वि: या घड्याळात तास काटा 2 च्या पुढे आणि मिनिट काटा 5 वर आहे. म्हणजे घड्याळात 2 वाजून 25 मिनिटे झाली आहेत . वि : बाई दुसऱ्या घड्याळ्यात तास काटा 1 च्या पुढे आणि मिनिट काटा 4 वर आहे. म्हणून घड्याळात 1 वाजून 20 मिनिटे झाली आहेत. शि: बरोबर. आणि आता या तिसऱ्या घड्याळ्यात किती वाजले आहेत? वि: तिसऱ्या घड्याळात 8 वाजून 55 मिनिटे झाली आहेत.