कालमापन

ताशी कालमापन

views

5:32
24 ताशी कालमापन : मध्यान्हपूर्व आणि मध्यान्होत्तर अशी विभागणी टाळण्यासाठी 24 ताशी कालमापन पद्धत वापरली जाते. आज आपण बऱ्याच ठिकाणी 24 ताशी घड्याळ पाहतो .उदा. रेल्वेस्टेशन , विमान , बस किंवा लांबच्या बोटी यांच्या वेळापत्रकां साठी ही पद्धत वापरतात. या 24 ताशी पद्धतीत दुपारी 12 नंतर 1,2,3,4.......... ऐवजी 13,14,15,...... असे तास मोजतात. 24 तासांच्या डिजिटल घड्याळात वेळ केवळ अंकांत दाखवली जाते. उदा. समजा सकाळचे 5 वाजून 35 मिनिटे ही वेळ दाखवायची असेल तर ती डिजिटल घड्याळात 5:35 अशी दाखवतात. आणि तीच वेळ जर संध्याकाळाची दाखवायची असेल तर ती डिजिटल घड्याळात 17:35 अशी दाखवतात. समजा डिजिटल घड्याळात 21:59 अशी वेळ दिली असेल. तर बरोबर एक मिनिटानंतर 22 तास पूर्ण होत असणार. आणि ते पूर्ण झाले की या डिजिटल घड्याळात 22:00 अशी वेळ दाखवली जाईल. तसेच डिजिटल घड्याळात 23:59 अशी वेळ दिली असेल, तर आणखी 1 मिनिटानंतर त्या घड्याळात 24 तास पूर्ण होतात. आणि दिवस बदलतो. त्यावेळी या घड्याळात 00:00 अशी वेळ दिसते. मात्र नेहमीच्या 12 तशी घड्याळात त्यावेळी रात्रीचे 12.00 वाजलेले असतात