कालमापन

कालमापनावरील उदाहरणे

views

4:21
कालमापनावरील उदाहरणे. मुलांनो आता आपण कालमापनावर आधारित उदाहरणे कशी सोडवायची ते बघूया. यासाठी आपण बेरीज -वजाबाकी या क्रियांचा वापर करायचा आहे. उदा 1) अजयने संगणकावर काम करण्यास सकाळी 11वाजता सुरवात केली व दुपारी 3:30 मिनिटांनी. त्याचे काम संपले. तर त्याने किती वेळ काम केले? हे उदाहरण आपण दोन पद्धतीने सोडवू शकतो. रीत ----1: अजय सकाळी 11 वाजता काम करण्यास बसला . म्हणजे 11 ते 12 - 1 तास, 12 ते 1- 1 तास, 1 ते 2 - 1 तास आणि 2 ते 3 - 1 तास असे त्याने 4 तास काम केले. त्याचे काम संपले दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी . 11 ते 3 पर्यंत एकूण 4 तास झाले आणि पुढील 30 मिनिटे आपण त्यात मिळवू. म्हणजे अजयने एकूण 4 तास + 30 मि काम केले. रीत---2 ( 24 ताशी कालमापन पद्धतीनुसार) सकाळी 11 म्हणजे 11:00 आणि दुपारी 3:30 म्हणजे 15:30.