कालमापन

उदाहरणे सोडवूया

views

4:27
शाब्दिक उदाहरण : 1) एक दुकान 9: 30 am ला उघडते व 10:00 pm ला बंद होते तर ते दुकान किती वेळ उघडे असते.? या उदाहरणामध्ये दुकान 9:30 am ला उघडते. आणि 10 pm वाजता बंद होते. 24 ताशी कालमापनानुसार, 9: 30 am म्हणजे 9:30 आणि 10:00 pm म्हणजे 22:00. तर 22:00 मधून 9:30 वजा करू. म्हणून दुकान 12 तास ३० मिनिटे उघडे असते. 2) गीताने सकाळी 2 तास 25 मिनिटे व दुपारी 1 तास 45 मिनिटे वर्गात शिकवले, तर तिने वर्गात एकूण किती वेळ शिकवले? एकूण वेळ काढण्यासाठी बेरीज करू. दोन्ही मिनिटांची बेरीज केली असता एकूण 70 मिनिटे झाली. 70 मिनिटे म्हणजे 1 तास 10 मिनिटे. यातील 1 तास हा 3 तासांमध्ये मिळवला आणि उरलेली 10 मिनिटे तशीच लिहिली. म्हणून गीताने एकूण 4 तास 10 मिनिटे वर्गात शिकवले.