ग्रामीण स्थानिक शासन संस्था

ग्रामसभा

views

2:24
गावामध्ये राहणाऱ्या मतदारांची सभा म्हणजे ग्रामसभा होय. मतदार म्हणजे ज्यांचे मतदारयादीत नाव आहे. अशा १८ वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्ती. ग्रामसभा ही स्थानिक पातळीवर राहणाऱ्या लोकांची महत्त्वाची संघटना आहे. आर्थिक वर्षात म्हणजेच एप्रिल महिन्यापासून ते पुढील वर्षातील मार्च महिन्यापर्यंत प्रत्येक ग्रामसभेच्या किमान सहा सभा होणे गरजेचे असते आणि त्या बोलावण्याची जबाबदारी सरपंचाची असते. प्रत्येक वर्षांच्या पहिल्या सभेत ग्रामपंचायतीने सादर केलेला वार्षिक अहवाल आणि हिशोबावर चर्चा होते. साधारणतः वर्षभराचा गावाचा जमा-खर्च, योजना, सुधारणा एका पुस्तकातून गावासमोर ठेवतात त्यालाच वार्षिक अहवाल असे म्हणतात. ग्रामसभेमध्ये सर्व सदस्य एकत्र येतात. लोकांच्या गरजा काय आहेत त्या ग्रामपंचायतीला कळविले जाते. आणि गावाच्या भल्यासाठी कोणत्या योजना अगोदर घ्याव्यात हे गावकरी सुचवितात. याशिवाय ग्रामपंचायतीने वर्षभरात गावांच्या विकासाची जी कामे केली असतील त्यांची माहिती व आढावा ग्रामसभेत घेतात. ग्रामपंचायतीने पुढील वर्षी विकासाची जी कामे करावयाची ठरविले असेल त्यांची माहिती घेऊन त्यांना मान्यता दिली जाते. ग्रामपंचायतीने वर्षभर केलेल्या खर्चाचा हिशोब या सभेत मांडला जातो. आणि पुढील वर्षी किती खर्च केला जाणार आहे त्याची माहिती दिली जाते. तसेच शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यास कोणत्या व्यक्ती पात्र आहेत ते ग्रामसभेत ठरविले जाते.