ग्रामीण स्थानिक शासन संस्था

जिल्हा परिषद

views

3:37
खेड्यातील अनेक घरे, मिळून गाव तयार होते अनेक गावे मिळून तालुके तयार होतात व अनेक तालुके मिळून जिल्हा तयार होतो. आणि अशा जिल्ह्याचा कारभार जिल्हा परिषद पाहत असते. महाराष्ट्रात ३६ जिल्हे आहेत. परंतु जिल्हा परिषदा मात्र ३४ आहेत. कारण मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे ग्रामीण लोकवस्तीचा भाग नाहीत. म्हणून त्यांच्यासाठी जिल्हा परिषदा नाहीत. त्यांचा कारभार महानगरपालिका पाहतात. महाराष्ट्रामध्ये जिल्हापरिषदेची स्थापना १ में १९६२ रोजी झाली. प्रत्येक जिल्हापरिषदेमध्ये लोकसंख्येनुसार कमीत कमी ५० व जास्तीत जास्त ७५ सभासद असतात. जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे सर्व सभापती हे जिल्हापरिषदेचे सदस्य असतात. जिल्हा परिषदेचा कारभार विविध समित्यांमार्फत चालवला जातो. वित्त समिती पैशासंबधी सर्व व्यवहार पाहते. कृषी समिती. शेतीविषयी समस्या सोडविण्याचा प्रयत्न करते. शिक्षण समिती आरोग्य समिती जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती महिलांचे व बालकांचे प्रश्न सोडविते.