ग्रामीण स्थानिक शासन संस्था

ग्रामसभेत महिलांचा सहभाग

views

4:8
गावाच्या विकास कार्यक्रमात महिलांचाही सहभाग असावा म्हणून महिलांसाठी स्वतंत्र ग्रामसभा घेणे कायद्याने बंधनकारक केले आहे. महिला ग्रामसभेला जरी हजर असल्या तरी पुरुषांपुढे बोलण्यास कचरतात. तसेच आपली मते मोकळे पणाने न मांडण्यामागे त्यांच्यावर मानसिक दबाव असतो. त्यामुळे महिलांची स्वतंत्र ग्रामसभा घेऊन त्यांनी खुली चर्चा करून त्यांचे प्रश्न, समस्या मांडल्या पाहिजेत आणि त्याप्रमाणे त्यांच्या हिताचे, सोईस्कर निर्णय त्यांना घेता आले पाहिजेत या उद्देशाने महिला ग्रामसभांना अतिशय महत्त्व आहे. अशा रीतीने महिला ग्रामसभेमध्ये महिलांनी मांडलेले विचार, प्रस्ताव ग्रामसभेमध्ये विचारात घेणे आवश्यक आहे. महिला ग्रामसभा प्रत्येक नियमित ग्रामसभेपूर्वी घेणे बंधनकारक आहे.या सभेत महिला मोकळेपणाने आपली मते मांडतात. महिलावर्गाच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले मुद्दे इथे विचारात घेतले जातात. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, शौचालयाचा प्रश्न, आरोग्य, रोजगार, शिक्षण, सार्वजनिक स्वच्छता, दारूची समस्या, स्वस्त धान्य दुकानासंबंधीच्या तक्रारी याबाबत महिला चर्चा करतात आणि आवश्यक ते बदलही सुचवतात.