गुणाकार व भागाकार

तीन अंकी संख्यांचा गुणाकार

views

4:6
तीन अंकी संख्यांचा गुणाकार.•तीन अंकी संख्येला तीन अंकी संख्येने गुणणे.•दोन अंकी संख्यांचा गुणाकार कसा करायचा ते आपण पाहिले. आता आपल्याला तीन अंकी संख्येला तीन अंकी संख्येने कशा पद्धतीने गुणावे हे पाहायचे आहे. यासाठी आपण काही उदाहरणे सोडवू. उदाहरण 1) : एका शाळेत 754 विद्यार्थी आहेत. एका विद्यार्थ्याच्या गणवेशाचा खर्च 368 रुपये येतो, तर सर्व विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा एकूण खर्च किती येईल? 754 × 368 _________ 6032 ( 8 या एककाने गुणले) + 45240 ( 6 या दशकाने म्हणजे 60 ने गुणले)+ 226200 ( 3 या शतकाने म्हणजे 300 ने गुणले)_________277472 ( 2 लक्ष 77 हजार 472 )सुरवातीला आपण हे गणित उभ्या मांडणीच्या स्वरुपात मांडू. आता 8 या एककाने 754 या संख्येला गुणू. आपण हा गुणाकार एका बाजूला करून घेऊ. तर आपले उत्तर आले आहे 6032. ते आपण उभ्या मांडणीत मांडले. आता आपल्याला 6 ने 754 या संख्येला गुणायचे आहे. पण या ठिकाणी 6 हा दशकाच्या स्थानात आहे. म्हणून आपण 60 ने 754 ला गुणू. हाही गुणाकार आपण एका बाजूला करू. आता आपले उत्तर आले आहे 45240. तेही आपण उभ्या मांडणीत मांडले. शेवटी आपल्याला 3 ने म्हणजेच 300 ने 754 या संख्येला गुणायचे आहे. कारण याठिकाणी 3 हा शतकाच्या स्थानात आहे. तर चला मग याचाही गुणाकार बाजूला करू. आता आपले उत्तर आले आहे 226200. ही संख्याही आपण उभ्या मांडणीत मांडू. आता सर्व संख्यांची म्हणजेच 6032 + 45240 + 226200 यांची बेरीज केली तर आपली एकूण संख्या झाली 277472. म्हणून गणवेशाचा एकूण खर्च होईल 2,77,472 रुपये.