गुणाकार व भागाकार

उदाहरणे

views

3:27
उदा. 3) एका संगणकाची किंमत 25,248 रु. आहे तर अशा 302 संगणकांची एकूण किंमत किती? 25248 × 302__________ 50496 + 000000 + 7574400___________ 7624896 आपण याही गणितामध्ये सर्वप्रथम 2 या एककाने 25248 या संख्येला गुणले. आणि आलेला गुणाकार 50496 हा उभ्या मांडणीमध्ये लिहिला. या नंतर 0 ने 25248 या संख्येला गुणले. पण तुम्हाला माहीतच आहे की शून्याने कोणत्याही संख्येला गुणले असता उत्तर शून्यच येते. यानंतर 3 शतक म्हणजे 300 ने 25248 ला गुणून आलेली संख्या 7574400 उभ्या मांडणीमध्ये लिहिली. शेवटी तीनही संख्यांची बेरीज केली. तर उत्तर आले 7624896. म्हणून जर एका संगणकाची किंमत 25,248 रु. असेल तर 302 संगणकांची एकूण किंमत 7624896 असेल.