चुंबकाची गंमत

प्रस्तावना

views

4:28
तुम्ही चुंबक सर्वांनी पाहिलेच असेल. चुंबकाकडे लोखंड, निकेल, कोबाल्ट या धातूंपासून बनलेल्या वस्तू आकर्षित होतात. चुंबक विविध वस्तूंमध्ये वापरला जातो. ज्या पदार्थाकडे लोखंड, निकेल, कोबाल्ट, इत्यादींपासून बनविलेल्या वस्तू आकर्षल्या जाता,. अशा पदार्थाला चुंबक असे म्हणतात. चुंबकाच्या या आकर्षून घेण्याच्या गुणधर्मालाच चुंबकत्त्व असे म्हणतात. जे पदार्थ चुंबकाला चिकटतात त्यांना ‘चुंबकीय पदार्थ’ असे म्हणतात. याउलट जे पदार्थ चुंबकाला चिकटत नाहीत, अशा पदार्थांना ‘अचुंबकीय पदार्थ’ असे म्हणतात.