चुंबकाची गंमत

होकायंत्राचा वापर

views

3:17
आता आपण होकायंत्राचा वापर कसा करतात ते पाहू. होकायंत्राचा वापर कशासाठी करतात ते पाहू. दिशा दर्शविण्यासाठी ह्याचा उपयोग होतो. चुंबकसूची वापरून दिशा ओळखण्यासाठी बनवलेल्या उपकरणास ‘होकायंत्र’ म्हणतात. या होकायंत्राची निर्मिती ‘लोडस्टोन’ या खडकाच्या वापरातून झाली. लोडस्टोन म्हणजेच मॅग्नेटाईटचा खडक. या खडकाचा तुकडा टांगून ठेवला तर तो नेहमी उत्तर-दक्षिण दिशेत स्थिर राहतो. यामुळे जुन्या काळातील युरोप आणि चीन मधील लोकांनी त्याचा वापर दिशा शोधण्यासाठी केला.