चुंबकाची गंमत

चुंबकाच्या सहाय्याने वीजनिर्मिती

views

3:24
चुंबकाच्या साह्याने वीजनिर्मिती: चुंबकाच्या साह्याने वीजनिर्मितीचे तंत्र मायकेल फॅरेडे या ब्रिटिश शास्त्रज्ञाने विकसित केले. गरीब कुटुंबात जन्मल्यामुळे एका पुस्तक विक्रेत्याकडे मायकेल यांना काम करावे लागत होते. तेथे त्यांनी विज्ञान विषयाची अनेक पुस्तके वाचली. त्यामुळे त्यांची विज्ञानातील रुची वाढत गेली. त्यानंतर लंडनच्या रॉयल इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी हे संशोधन केले. त्यांच्या या संशोधनामुळे दैनंदिन जीवनातील अनेक उपकरणांमध्ये विजेचा व विद्युत चुंबकाचा वापर आज आपण करू शकतो.