शिवपूर्वकालीन भारत

वायव्येकडील आक्रमणे भाग १.: उत्तरेकडील सुलतानशाही

views

2:39
वायव्येकडील आक्रमणे भाग १: उत्तरेकडील सुलतानशाही: इसवी सन 1175 ते 1178 मध्ये अफगणिस्थानातील घूर येथील मुहम्मद घोरी याने भारतावर आक्रमणे केली. मुहम्मद घोरी व पृथ्वीराज चौहान यांच्यात दोन युद्धे झाली होती. पहिल्या युद्धात पृथ्वीराज जिंकले तर दुसऱ्या युद्धात मुहम्मद घोरी जिंकला. त्याने सर्व प्रदेश आपल्या ताब्यात घेतला. तसेच घोरीने दिल्लीचा राजा जयचंद याचाही पराभव केला. घोरीने आपण जिंकून घेतलेल्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी कुतुबुद्दीन ऐबक याची नेमणूक केली, आणि तो गजनीला निघून गेला. पुढे इ.स. १२०६ मध्ये मुहम्मद घोरीच्या मृत्युनंतर ऐबकाने आपल्या प्रभुत्वाखाली असलेल्या भारतातील प्रदेशाचा कारभार स्वतंत्रपणे पाहण्यास सुरूवात केली. तो गुलाम असूनही दिल्लीचा पहिला सुलतान बनला. त्याने केवळ 1206 ते 1210 अशी 4 वर्षे राज्य केले. आणि १२१० मध्ये त्याचा मृत्यू झाला. ऐबकानंतर अल्तमश, रझिया, बल्बन, अल्लाउद्दीन खल्जी, मुहम्मद तुघलक, फिरोज तुघलक, इब्राहीम लोदी या सुलतानांनी भारतावर राज्य केले. इब्राहीम लोदी हा शेवटचा सुलतान होता. बाबराने इब्राहीम लोदीचा पराभव केला आणि त्याबरोबरच सुलतानशाहीचा शेवट झाला. बाबराने भारतात मुघल वंशाची स्थापना केली.