शिवपूर्वकालीन भारत

विजयनगरचे राज्य

views

2:33
विजयनगरचे राज्य :- आता आपण दक्षिण भारतातील विजयनगर राज्याविषयी माहिती घेऊ.दिल्लीचा सुलतान मुहम्मद तुघलकाच्या काळात त्याच्या अनेक चुकीच्या निर्णयांमुळे सर्वत्र अशांतता पसरू लागली. सैनिकांमध्ये फूट पडू लागली. त्यामुळेच दक्षिणेकडील सरदारांनी त्याच्या सत्तेविरुद्ध उठाव केले. आणि त्यातूनच विजयनगर व बहमनी ही दोन प्रबळ राज्ये उदयास आली. हरिहर आणि बुक्क हे दक्षिण भारतातील दोघे भाऊ दिल्लीच्या सुलतानशाहीच्या सेवेत सरदार म्हणून होते. मुहम्मद तुघलकाच्या काळात निर्माण झालेल्या अस्थिरतेचा व अशांततेचा फायदा घेऊन त्यांनी १३३६ मध्ये दक्षिणेत विजयनगर या राज्याची स्थापना केली. आजच्या कर्नाटक राज्यातील ‘हंपी’ही या राज्याची राजधानी होती. हरिहर हा विजयनगरचा पहिला राजा झाला. तेव्हा महाराष्ट्र हरिहराच्या अंमलाखाली होता. त्याने आपल्या कारकिर्दीत तुंगभद्रा नदीच्या परिसरातील प्रदेश, कोकणातील काही भाग आणि केरळमधील मलबारच्या किनारपट्टीचा प्रदेश जिंकून घेतला. यासाठी त्याला बहमनी सत्तेशी खूप संघर्ष करावा लागला. हरिहर नंतर त्याचा भाऊ बुक्क सत्तेवर आला. त्याने रामेश्वरपर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला. बुक्कराय हा एक समर्थ राजा होता. त्याच्या कारकिर्दीत तामिळ प्रांत पूर्णपणे विजयनगरकडे आला. मलबार आणि श्रीलंका यांच्या तत्कालीन राजांनी तर त्यांचे सार्वभौमत्व मान्य करून त्यांच्याशी मैत्रीचे संबंध राखले होते. यानंतर बुक्करायाचा मुलगा दुसरा हरिहर 1377मध्ये गादीवर बसला